कविता :- चल ना आपण दोघं 'अक्षर' होऊयात.....
चल अक्षर होऊयात:-
चल ना आपण दोघं 'अक्षर' होऊयात.....
जवळ येऊन एक 'शब्द' बनूयात,
'वर्णमालेतील' इतर अक्षरांमध्ये दोघेच वेगळे ठरूयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (१)
'साहित्याच्या' पावसात दोघेच चिंब भिजूयात,
'कविता' होऊन प्रत्येकाला निसर्ग देऊयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (२)
गोष्टरुपी' सागरात दोघेच मुक्त विहार करूयात,
एकमेकांच्या सहवासात 'तात्पर्य' नावाच्या किनाऱ्यावर पोहचूयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (३)
'लेख' नावाच्या गर्द राईत शीळ बनून घुमूयात,
'कादंबरीच्या' घरट्यात पक्ष्यांना साद घालूयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (४)
'नाटक' नावाच्या झोपाळ्यावर उंच विहार करूयात,
अस्ताच्या सुर्यपटलावर रूप नावाचा 'संवाद' लिहूयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (५)
'अलंकारांनी' नटलेली मनोहर मूर्ती होऊयात,
'व्याकरणरुपी' फुलांची त्या मूर्तीत माळ होऊयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (६)
'पुस्तकरुपी' जीवनात पान नावाचं सुख आणूयात,
भावना नावाची 'शाई' होऊन अस्तित्व नावाची 'ओळ' लिहूयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (७)
'भाषा' नावाचं गाव निर्माण करून,
'लेखणी' नावाचं नवं घर बांधूयात,
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात.....
चल ना आपण दोघं अक्षर होऊयात..... (८)

Comments
Post a Comment