कविता :- पत्रास कारण की........!

                                '' पत्रास कारण की........! '' 





''कॉलेजमध्ये ज्यावेळी तू मला पहिल्यांदा  पाहिलस, त्या वेळेसच  तू प्रेम वेडा
झालास,
तुझ्या या प्रेमाचं उत्तर म्हणून सुंदर हास्य मी केलं
आणि त्या हास्यालाच तू भावलास,
अश्रू  तुझे घेत आहे, हास्य माझं  घेऊन जा
मला मात्र विसरून जा.............!


प्रेमाचं  प्रतिक म्हणून सुंदर गुलाब दिलस तू मला
गुलाबाचा हाच सुगंध घायाळ करायचा मला,
पाकळ्या त्या घेत आहे, काटे तू घेऊन जा
मला मात्र विसरून जा.............!


प्रिय सखी - सखा म्हणत एकमेकांना पत्र आपण पाठवली
वरून सारं पत्र मराठीत जरी असलं ,
तरी पत्राची शेवट मात्र इंग्रजीच्या 'आय लव्ह यू'  च्या तीन शब्दांनीच झाली,
शब्द तुझे घेत आहे, निव्वळ कोरा कागद तू घेऊन जा,
मला मात्र विसरून जा...............!


लपून छपून भेटायचो आपण एकमेकांना
चोरून भेटण्याचा तो आनंदच होता वेगळा
सुख तुझं  घेत आहे, दुःखं  माझं  घेऊन जा,
मला मात्र विसरून जा..............!


प्रेमाच्या  या भेटीगाठीत खूप वचनं  केली
प्रेमाला या विसरायचं नाही म्हणून खूप शपथही  घेतली
वचन तुझं  घेत आहे, शपथ माझी घेऊन जा,
मला मात्र  विसरून जा..............!


क्षणोक्षणीच्या सुखांना दुजोरा तू दिलास
प्रत्येक क्षण क्षण हर्षीलेस   तू मला
क्षण तुझे घेत आहे, आठवणी माझ्या  घेऊन जा
मला मात्र विसरून जा................!


खूप सारं प्रेम दिलस तू मला
तुझ्या या प्रेमाचा अर्थच तो निराळा
प्रेम तुझं घेत आहे, भावना माझ्या घेऊन जा
मला मात्र विसरून जा..............!


 साथ तुझी सोडते आहे
शतजन्माची गाठ आपली तोडते आहे,
साथ तुझी घेत आहे , तूटलेली गाठ तू घेऊन जा
मला मात्र विसरून जा................!


प्रेम, क्षण , पत्र, गुलाब, भावना, हे सारं काही व्यर्थ  होतं
कारण माझं खरं प्रेम कधीच तूझ्यावर नव्हतं ;
म्हणूनच  निरोप तुझा घेत आहे, निरोप माझा घेऊन जा
मला मात्र विसरून जा...
मला मात्र विसरून जा...............!''

- ऋषिकेश मुळे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझा कॉलेजचा पहिला दिवस

“गोरक्षकता फक्त हत्येपुरतीच का ! मग रस्त्यावरच्या गाईचं काय ?”

"राजू परुळेकर- ही व्यक्ती नव्हे एक विचार आहे"