कविता :- आठवण

                                                          ''  आठवण ''

'' आठवण म्हणजे, तुझ्या विचारांचा असलेला एक व्यास,
 मनाच्या पैलतीलावरचा केलेला त्याच एका मनाचा तोच एक ध्यास

 आठवण म्हणजे, तू ,मी आणि किनारा म्हणत हातात हात घालून केलेली किनाऱ्यावरची ती ओली चाल,
अन पुढे जाता जाता पाठीमागे वळून पाहिल्यावर दिसणारी, आपल्या त्याच पायाच्या ठशांनी अंथरलेली ती ओली शाल

 आठवण म्हणजे, नकळत घडून आलेली एक हृदयस्पर्शी भावना ,
 शब्दावाचून कळलेल्या खऱ्या प्रेमाची तीच एक धारणा

 आठवण म्हणजे, हुरहुरता क्षणांना मिळणारी गगनातील एक साद ,
 अन आसमंतातल्या नक्षत्रांना हवासा वाटणारा तोच एक आस्वाद

 आठवण म्हणजे, तुझ्यावरची कविता लिहिण्यासाठी पेन पकडणाऱ्या दोन बोटांनी केलेली ती अलगद चिमुट ,
 अन तिच्यावरच्या त्याच कवितेत तिच्यावरचीच स्तुतिसुमने उधळण्यासाठी इंद्रधनुच्या रंगांनी केलेली ती एक लुट

 आठवण म्हणजे, पहिल्या पावसात धरणीवर पडणाऱ्या पहिल्या थेंबाचा तो गंध ,
 अन त्याच धरणीतून पुढे बीजातून फुलात रुपांतरीत होणाऱ्या पुष्पाचा तोच एक नयनरम्य सुगंध

 आठवण म्हणजे, श्रावणात पालवीला फुटलेला  एक नवा अंकुर ,
 अन त्याच श्रवणात चमचमत्या राविकीरणांकडे झेपावणारा तोच एक नवा नुपूर

 आठवण म्हणजे भयाण शांततेत कधीतरी एकाकी अचानक चेहऱ्यावर फुलणारं हास्य ,
 तुझ्याच गर्त्येत नाहून निघणारं तेच एक सामरस्य

 आठवण म्हणजे, मोठ्या सफरीवर निघालेली ती एक नाव ,
 अन त्याच नावेत बसून स्वप्नांच्या किनाऱ्यावर पोहचवणारं प्रेम नावाचं ते एक गाव "


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझा कॉलेजचा पहिला दिवस

“गोरक्षकता फक्त हत्येपुरतीच का ! मग रस्त्यावरच्या गाईचं काय ?”

"राजू परुळेकर- ही व्यक्ती नव्हे एक विचार आहे"