Posts

Showing posts from November, 2017

“गोरक्षकता फक्त हत्येपुरतीच का ! मग रस्त्यावरच्या गाईचं काय ?”

Image
       भारतीय हिंदू शास्त्राला एक अजस्त्र असा दीर्घ इतिहास आहे. वेद, शास्त्र, पुराणे यांच्या भक्कम आधारावर हिंदू धर्म आजतागायत अविरत बलाढ्यपणे उभा आहे. असे आपण अभिमानाने म्हणत असतो. समाजातील अनेक घटकांना आपण हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून संबोधत असतो. आदिमानव म्हणजेच सर्व परिचित अश्या अश्मयुगीन काळापासून हिंदू धर्मातील देव देवतांचे प्रतीक म्हणून मानला जाणारा घटक म्हणजे निसर्ग. पूर्वीचा मानव हा निसर्गपूजक होता. निसर्गातील प्रत्येक घटकाला आदिमानव हा आधारदाता देव मानत असे. पूर्वीचा मानव हा जरी मांसाहार करत असला तरी त्याच्या या निसर्गपूजेत प्राणी देखील येत असत. तो प्राण्यांच्या पालनपोषणासोबत त्यांचा पूजक देखील होता आणि काळ जसजसा सरत गेला तसतशी  त्याची निसर्गपूजा कमी होत गेली. परंतु यातील एक महत्वाचा पूजेचा घटक अजूनही जिवंत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या तीन चार वर्षांपासून तर त्याची महती प्रत्येक स्तरावरील लोकांना एका वेगळ्या मुद्द्यामुळे निश्चितच माहित झालेली आहे. हा घटक म्हणजे गोमाता, म्हणजेच गाय हा प्राणी. "३३कोटी देवांचा अधिवास जिच्या उदरात आहे, अशी ती गाय" असा...