Posts

Showing posts from 2017

“गोरक्षकता फक्त हत्येपुरतीच का ! मग रस्त्यावरच्या गाईचं काय ?”

Image
       भारतीय हिंदू शास्त्राला एक अजस्त्र असा दीर्घ इतिहास आहे. वेद, शास्त्र, पुराणे यांच्या भक्कम आधारावर हिंदू धर्म आजतागायत अविरत बलाढ्यपणे उभा आहे. असे आपण अभिमानाने म्हणत असतो. समाजातील अनेक घटकांना आपण हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून संबोधत असतो. आदिमानव म्हणजेच सर्व परिचित अश्या अश्मयुगीन काळापासून हिंदू धर्मातील देव देवतांचे प्रतीक म्हणून मानला जाणारा घटक म्हणजे निसर्ग. पूर्वीचा मानव हा निसर्गपूजक होता. निसर्गातील प्रत्येक घटकाला आदिमानव हा आधारदाता देव मानत असे. पूर्वीचा मानव हा जरी मांसाहार करत असला तरी त्याच्या या निसर्गपूजेत प्राणी देखील येत असत. तो प्राण्यांच्या पालनपोषणासोबत त्यांचा पूजक देखील होता आणि काळ जसजसा सरत गेला तसतशी  त्याची निसर्गपूजा कमी होत गेली. परंतु यातील एक महत्वाचा पूजेचा घटक अजूनही जिवंत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या तीन चार वर्षांपासून तर त्याची महती प्रत्येक स्तरावरील लोकांना एका वेगळ्या मुद्द्यामुळे निश्चितच माहित झालेली आहे. हा घटक म्हणजे गोमाता, म्हणजेच गाय हा प्राणी. "३३कोटी देवांचा अधिवास जिच्या उदरात आहे, अशी ती गाय" असा...

"छायाचित्र विरुद्ध DSLR"

Image
          गणपती अवघ्या काही दिवसांवर आले असताना. नेहमीप्रमाणे आईने घराच्या साफसफाईसाठी लागणाऱ्या मदतीचे कॉन्ट्रॅक्ट मला दिले. बदल्यात गणपतीत जास्तीचे उकडीचे मोदक खाऊन देण्याचं वचन देखील दिलं. साफसफाईला सुरुवात झाली. केरसुणीसारखं शस्त्र हातात घेऊन (होय शस्त्रच कारण याच शस्त्राने आमच्यावर लहानपणी खूप अन्याय केला आहे), तोंडाला संरक्षक म्हणून रुमाल बांधून आम्ही लढाईस सज्ज झालो. काही काळ लढाई करता करता पोटमाळ्यावर एक खजिनारूपी पत्र्याची भली मोठी पेटी हाती लागली. त्याच्यावर असणारी धूळ साफ केली आणि ती उघडण्याचा प्रयत्न करू लागलो. ती तिथेच कशीबशी हळूच आवाज न करता उघडली. कारण खाली आणून उघडली असती तर मातोश्रींकडून जास्तीच्या बंदुकीच्या फैरी आमच्यावर झाडल्या गेल्या असत्या. म्हणून वरच ती उघडली. पणजोबा, आजोबा यांच्या काळातील राखून ठेवलेल्या काही महत्वाच्या गोष्टी त्यात होत्या. त्यातच एक सर्वात महत्वाची गोष्ट होती ती त्या काळातील म्हणजेच पणजोबा आजोबा यांच्या काळातील असणारा 'छायाचित्रांचा संग्रह'. माफ करा, 'फोटो अल्बम' असं म्हणतो म्हणजे लवकर कळेल. मग लढाईची सर्व शस्त्र ...

"राजू परुळेकर- ही व्यक्ती नव्हे एक विचार आहे"

Image
        अनेकदा एखाद्या कार्यक्रमाला येणारा पाहुणा हा सभागृहात येत असताना पहिले व्यासपीठाकडे पाहतो. तेथील अरेंजमेंट वगैरे, नंतर इतर आपल्या ओळखीतील पाहुणे मंडळी कोण आ...

"वंदे मातरम् चा मुद्दा गाजतोय, विरोध करा पण विनयाची कास सोडू नका"

Image
" वंदे मातरम् चा मुद्दा गाजतोय , विरोध करा पण विनयाची कास सोडू नका"               ट्रेनने ठाण्याला येत होतो. सध्या वंदे मातरम् वरून मुद्दा गाजतोय. वेळ जपावा म्हणून त्याच्यावरच वाचत विचार करत असताना , पुढल्या स्टेशनला , बाजूला एक त्रिकोणी मुस्लिम कुटुंब बसायला आलं , आई वडील हे त्या कुटुंबाचाच एक लहान सदस्य असणाऱ्या आपल्या मुलाचे छान लाड करत होते. इतक्यात ट्रेनमध्ये पॉपकॉर्न विकणारी बाई चढली त्या लहान मुलाच्या पित्याने त्या बाईला आवाज दिला "ओ मावशी". मावशी असा आवाज दिल्यामुळे माझं कुतूहल अधिक जागं झालं. त्याने त्या बाईकडून पॉपकॉर्न विकत घेतले आणि आपल्या लहान मुलाच्या हातात दिले. हसत खेळत असताना त्या मुलाचे वडील म्हणाले , " अपने आईको दे" त्या लहान मुलाने त्याच्या आईला एक पॉपकॉर्न दिलं. नंतर ते पुन्हा म्हणाले "अब अपने बाबाको दे" त्या लहान मुलाने त्याच्या वडिलांनापण दिलं. आई आणि बाबा हे शब्द मला त्या कुटुंबाविषयी अधिक विचार करायला लावणारे   ठरले. कारण मुस्लिम कुटुंबात आईला अम्मी आणि वडिलांना अब्बू असं संबोधतात. पण त्या मुस...