Posts

Showing posts from October, 2015

कविता :- आठवण

                                                          ''  आठवण '' '' आठवण म्हणजे, तुझ्या विचारांचा असलेला एक व्यास,  मनाच्या पैलतीलावरचा केलेला त्याच एका मनाचा तोच एक ध्यास  आठवण म्हणजे, तू ,मी आणि किनारा म्हणत हातात हात घालून केलेली किनाऱ्यावरची ती ओली चाल, अन पुढे जाता जाता पाठीमागे वळून पाहिल्यावर दिसणारी, आपल्या त्याच पायाच्या ठशांनी अंथरलेली ती ओली शाल  आठवण म्हणजे, नकळत घडून आलेली एक हृदयस्पर्शी भावना ,  शब्दावाचून कळलेल्या खऱ्या प्रेमाची तीच एक धारणा  आठवण म्हणजे, हुरहुरता क्षणांना मिळणारी गगनातील एक साद ,  अन आसमंतातल्या नक्षत्रांना हवासा वाटणारा तोच एक आस्वाद  आठवण म्हणजे, तुझ्यावरची कविता लिहिण्यासाठी पेन पकडणाऱ्या दोन बोटांनी केलेली ती अलगद चिमुट ,  अन तिच्यावरच्या त्याच कवितेत तिच्यावरचीच स्तुतिसुमने उधळण्यासाठी इंद्रधनुच्या रंगांनी केलेली ती एक लुट  आठवण म्हणजे...

माझा कॉलेजचा पहिला दिवस

                                                                        श्री                               नमस्कार ! आज ब्लॉग लिहिण्याची पहिली वेळ. तशी आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट हि त्या त्या योग्य वेळेस अनुसरून असते .मी  या सुरुवातीच्या माझ्या ब्लॉग लिहण्याच्या विचारात असताना सुरुवात नक्की कुठून करावी हेच मुळात कळत नव्हतं . तेव्हा एक गोष्ट  सुचली कि, ज्यामुळे आपण ब्लॉग लिहिण्यास प्रवृत्त झालो अश्या गोष्टीने सुरुवात केली तर काय  हरकत आहे. आणि म्हणूनच माझं हे पहिलं  लिखाण म्हणजेच, माझं माध्यम क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी असणारं कॉलेज  मधलं  पहिलं पाऊल. "अर्थातच माझा कॉलेजचा पहिला दिवस"            कॉलेज म्हंटलं की मजा -मस्तीच्या फुलपाखरांना हवेत झेपावण्याचं ठिकाण,प्रत्ये...