कविता :- आठवण
'' आठवण '' '' आठवण म्हणजे, तुझ्या विचारांचा असलेला एक व्यास, मनाच्या पैलतीलावरचा केलेला त्याच एका मनाचा तोच एक ध्यास आठवण म्हणजे, तू ,मी आणि किनारा म्हणत हातात हात घालून केलेली किनाऱ्यावरची ती ओली चाल, अन पुढे जाता जाता पाठीमागे वळून पाहिल्यावर दिसणारी, आपल्या त्याच पायाच्या ठशांनी अंथरलेली ती ओली शाल आठवण म्हणजे, नकळत घडून आलेली एक हृदयस्पर्शी भावना , शब्दावाचून कळलेल्या खऱ्या प्रेमाची तीच एक धारणा आठवण म्हणजे, हुरहुरता क्षणांना मिळणारी गगनातील एक साद , अन आसमंतातल्या नक्षत्रांना हवासा वाटणारा तोच एक आस्वाद आठवण म्हणजे, तुझ्यावरची कविता लिहिण्यासाठी पेन पकडणाऱ्या दोन बोटांनी केलेली ती अलगद चिमुट , अन तिच्यावरच्या त्याच कवितेत तिच्यावरचीच स्तुतिसुमने उधळण्यासाठी इंद्रधनुच्या रंगांनी केलेली ती एक लुट आठवण म्हणजे...