"वंदे मातरम् चा मुद्दा गाजतोय, विरोध करा पण विनयाची कास सोडू नका"
" वंदे मातरम् चा मुद्दा गाजतोय , विरोध करा पण विनयाची कास सोडू नका" ट्रेनने ठाण्याला येत होतो. सध्या वंदे मातरम् वरून मुद्दा गाजतोय. वेळ जपावा म्हणून त्याच्यावरच वाचत विचार करत असताना , पुढल्या स्टेशनला , बाजूला एक त्रिकोणी मुस्लिम कुटुंब बसायला आलं , आई वडील हे त्या कुटुंबाचाच एक लहान सदस्य असणाऱ्या आपल्या मुलाचे छान लाड करत होते. इतक्यात ट्रेनमध्ये पॉपकॉर्न विकणारी बाई चढली त्या लहान मुलाच्या पित्याने त्या बाईला आवाज दिला "ओ मावशी". मावशी असा आवाज दिल्यामुळे माझं कुतूहल अधिक जागं झालं. त्याने त्या बाईकडून पॉपकॉर्न विकत घेतले आणि आपल्या लहान मुलाच्या हातात दिले. हसत खेळत असताना त्या मुलाचे वडील म्हणाले , " अपने आईको दे" त्या लहान मुलाने त्याच्या आईला एक पॉपकॉर्न दिलं. नंतर ते पुन्हा म्हणाले "अब अपने बाबाको दे" त्या लहान मुलाने त्याच्या वडिलांनापण दिलं. आई आणि बाबा हे शब्द मला त्या कुटुंबाविषयी अधिक विचार करायला लावणारे ठरले. कारण मुस्लिम कुटुंबात आईला अम्मी आणि वडिलांना अब्बू असं संबोधतात. पण त्या मुस...