कविता :- पत्रास कारण की........!
'' पत्रास कारण की........! '' ''कॉलेजमध्ये ज्यावेळी तू मला पहिल्यांदा पाहिलस, त्या वेळेसच तू प्रेम वेडा झालास, तुझ्या या प्रेमाचं उत्तर म्हणून सुंदर हास्य मी केलं आणि त्या हास्यालाच तू भावलास, अश्रू तुझे घेत आहे, हास्य माझं घेऊन जा मला मात्र विसरून जा.............! प्रेमाचं प्रतिक म्हणून सुंदर गुलाब दिलस तू मला गुलाबाचा हाच सुगंध घायाळ करायचा मला, पाकळ्या त्या घेत आहे, काटे तू घेऊन जा मला मात्र विसरून जा.............! प्रिय सखी - सखा म्हणत एकमेकांना पत्र आपण पाठवली वरून सारं पत्र मराठीत जरी असलं , तरी पत्राची शेवट मात्र इंग्रजीच्या 'आय लव्ह यू' च्या तीन शब्दांनीच झाली, शब्द तुझे घेत आहे, निव्वळ कोरा कागद तू घेऊन जा, मला मात्र विसरून जा...............! लपून छपून भेटायचो आपण एकमेकांना चोरून भेटण्याचा तो आनंदच होता वेगळा सुख तुझं घेत आहे, दुःखं माझं घेऊन जा, मला मात्र विसरून जा..............! प्रेमाच्या ...