“ शिवस्मारक नव्हे हे तर शिवसंस्कार मारक ’’
“ शिवस्मारक नव्हे हे तर शिवसंस्कार मारक ’’ बदल हा काळानुरूप होत आहे . आणि तो व्हायला देखील हवा . परंतु असाच एक घटक ज्यात सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून ते आजच्या टेक्नॉसेव्ही जगापर्यंत काडीमात्र बदल झालेला नाही . हा घटक म्हणजे अर्थातच राजकारण . तसे राजकारणात बरेच बदल झाले . परंतु विशेषतः भारतीय राजकारणाच्या बाबतीत भौतिक स्वरूपात हे मोठ्या प्रमाणावर बदल झाले . पण याच भारतीय राजकारणाच्या मानसिकतेत मात्र आजवर तिळमात्र बदल झालेला नाही . त्या त्या काळातील साम्राज्यवाद व त्या साम्राज्यवादाचे नेतृत्व करणारी व्यक्ति , संघटना ही या भारतीय राजकारणातील निकृष्ट मानसिकतेची उदाहरणे ठरतील . अशीच निकृष्ट मानसिकतेची जाणीव ही दिनांक १३ मार्च २०१५ तारखेनंतरच्या कालावधीत झाली . यात प्रामुख्याने दोन घटक होते . एक म्हणजे ‘ लेख व्यवस्थित न वाचता त्यात शब्दांची अफरातफर करून पोस्ट करणारे लोक ’ व दुसरे म्हणजे राजकारण . टि ....